काँग्रेसचा हात सोडल्यानंतर ‘या’ युवा नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश!

काँग्रेसचा हात सोडल्यानंतर ‘या’ युवा नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश!

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडत आहेत. अशातच गुजरातचे युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी भाजपत प्रवेश केला आहे. अल्पेश यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानंतर त्यांनी भाजपला साथ देण्याचं ठरवलं आहे. काल अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह झाला यांनी भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याची बोललं जात आहे.

दरम्यान जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांनी 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी प्रचार केला होता. या तिन्ही नेत्यांच्या झंझावाती प्रचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचीही चिंता वाढली होती. भाजपने काठावर पास होत बहुमताचा आकडा गाठला आणि काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली होती. काँग्रेसच्या तिकीटावर अल्पेश आमदार झाले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी साबरकांठा मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र काँग्रसने याकडे दुर्लक्ष करत जगदीश ठाकोर यांना उमेदवारी दिली.त्यामुळे ते पक्षावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS