काँग्रेसला धक्का, आणखी एका नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश !

काँग्रेसला धक्का, आणखी एका नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. भाजपच्या गोठात आज काँग्रेसचा आणखी एक नेता सामील झाला आहे. काँग्रेस नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, विनोद तावडे यांच्या उपस्थित निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान यावेळी रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राष्ट्रवादीला विरोध करण्यात मी थेट भूमिका घेतली होती. नीराचं पाणी आमच्या शिवेवर आलय, ते पाणी मिळावे ही आमची इच्छा होती, पण बारामतीकरांनी हे होऊ दिले नसल्याचं निंबाळकर यांनी म्हटलं आहे. तसेच आमच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी सांगितले होते, आघाडी असली तरी आम्ही राष्ट्रवादीला मदत करणार नाही. आमची कामे होऊच द्यायचे नाही मग आम्ही आघाडीचा धर्म कसा निभावणार असंही यावेळी निंबाळक म्हणालेत.

तसेच फलटणच्या विकासात मुख्यमंत्र्यांनी आता भरीव योगदान दिले आहे. या सरकारच्या कारभारामुळे साखर कारखाने आणि सोसायट्या जिवंत आहेत. माढाची लढाई जिंकली की, देशाची लढाई जिंकल्यात जमा आहे असंही यावेळी निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS