परभणीचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादी प्रवेश !

परभणीचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादी प्रवेश !

परभणी – परभणीचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी भवनामध्ये घनदाट मामा यांचा पक्षप्रवेश झाला. सीताराम घनदाट हे अपक्ष आमदार होते.

सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे परभणी पक्षाचे बळ वाढले अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. घनदाट मामा चांगले नेते आहेत ते गेले काही महिने संपर्कात होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीत तिकीट मागितलं होतं पण आम्ही देऊ शकलो नाही अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

COMMENTS