शिवसेनेला धक्का, आणखी एका नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश!

शिवसेनेला धक्का, आणखी एका नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश!

जळगाव – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. अशातच आज जळगावमध्ये शिवसेनेचे व सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक आण्णा भापसे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकर, आमदार सतिष पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या उपस्थितीत आण्णा भापसे यांनी जाहीर प्रवेश केला आहे.

दरम्यान महापालिकेत खानदेश विकास आघाडी व शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थ म्हणून आण्णा भापसे ओळखले जातात. इतकेच नाही,तर काही दिवसांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आण्णा भापसे यांच्या पत्नी शिवसेना पुरस्कृत म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे शिवसेमेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

COMMENTS