आणखी एका नेत्यानं केला शिवसेनेत प्रवेश!

आणखी एका नेत्यानं केला शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरु आहे. आज अकोला जिल्ह्यातील लोकजागर मंचाचे अनिल गावंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधत पक्षात त्यांचे स्वागत केले आहे. गावंडे यांचा अकोला जिल्ह्यात मोठा जनसंपर्क असून त्यांच्या प्रवेशामुळे अकोला येथे शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला होणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान अनिल गावंडे यांनी लोकजागर मंच या संघटनेची स्थापना केली असून या संघटनेद्वारे ते शेतकरी आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहे.लोकजागर मंचाच्या वतीने अकोला जिल्ह्यात एक दूध डेअरी उभी करण्यात आली आहे. या डेअरीची क्षमता 50 हजार लिटर प्रति दिन  इतकी असून इथे महिला बचत गटाच्या माध्यमातून चिक्की, मशरूम पापड, घरगुती मसाले याची निर्मितीही केली जाते. तसेच अकोला जिल्ह्यातील गावांमधील खड्डे बुजवण्यासाठी गावंडे यांनी खड्डे बुजाव- जान बचाव ही  लोक चळवळही सुरू केली आहे.

COMMENTS