नारायण राणेंना धक्का, मुंबईतील ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश!

नारायण राणेंना धक्का, मुंबईतील ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – खासदार नारायण राणे यांना मुंबईत मोठा धक्का बसला असुन त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या चेंबूर येथील माजी नगरसेविका निलम डोळस यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला अहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना भवन येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
तसेच ईशान्य मुंबईचे प्रमुख कार्यकर्ते हरीश विचारे यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आपल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे विलीनीकरण करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. तरी राणे यांच्या भाजपप्रवेशास शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही विरोध असल्याने राणे यांच्या भाजपप्रवेशाबाबत अनिश्चितता आहे. परंतु राणे यांचा भाजपप्रवेश होण्यापूर्वीच त्यांना धक्का बसला असून त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या चेंबूर येथील माजी नगरसेविका निलम डोळस यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला अहे.

COMMENTS