राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश!

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकानं आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. घाटकोपरमधील प्रभाग १२४च्या नगरसेविका ज्योती खान यांचे पती हारून खान यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. हारून खान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घाटकोपर आणि विक्रोळीतील नेते आहेत. घटकोपरमधील भाजपाचे प्रवीण छेडा आणि मंगल भानुशाली यांनी भाजपा सोडल्यानंतर हारून खान यांना भाजपाने आपल्याकडे वळवले होते. पण आता छेडा आणि भानुशाली हे भाजपात परतले आणि हारून खान हे भाजपाला सोडून शिवसेनेत गेले आहेत.

दरम्यान जानेवारी २०१८ मध्ये हारून खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. हारून खान यांनी मुलगा रोशन खानसह भाजपात प्रवेश केला होता. परंतु आता त्यांनी भाजपला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

COMMENTS