पुणे लोकसभेसाठी आणखी एक नेता दिल्लीत, मल्लिकार्जून खर्गेंची घेतली भेट !

पुणे लोकसभेसाठी आणखी एक नेता दिल्लीत, मल्लिकार्जून खर्गेंची घेतली भेट !

नवी दिल्ली –  आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी कालच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मल्लिकार्जून खर्गे यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आज  संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवणी गायकवाड यांनी दिल्लीत जाऊन खर्गे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पुणे लोकसभेतून उमेदवारी देण्याची मागणी खर्गे यांच्याकडे केली असल्याची माहिती आहे.ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रवीण गायकवाड यांनी आज खर्गेंची भेट घेतली. याआधी प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली होती.

दरम्यान प्रवीण गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. बारामतीतील गोविंद बाग या पवारांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली होती. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांनीच राहुल गांधींना पुणे लोकसभेसाठी प्रवीण गायकवाड यांचं नाव सुचवलं होतं. त्याला राहुल गांधी यांनी हिरवा कंदीलही दिला.

मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या प्रवीण गायकवाड यांच्यासह बाहेरुन पक्षात आलेल्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रवीण गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंत आज त्यांनी मल्लिकार्जून खर्गे यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे गायकवाड यांना उमेदवारी दिली जाणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS