लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची ताकद वाढली,आणखी एक नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची ताकद वाढली,आणखी एक नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी याबाबत माहिती दिली आहे. अखेर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शरद पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतरच राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचं वाघेला यांनी सांगितलं.

दरम्यान यापूर्वी काँग्रेस आणि भाजपामध्ये राहिलेल्या वाघेला यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.

वाघेलांचा राजकीय प्रवास

वाघेला हे सुरुवातीला भाजपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी 1995 भाजप सोडली. त्यानंतर काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा घेत 1996 मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मनमोहन सिंह सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपदही मिळालं. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष तसंच गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं. नंतर 2017 च्या विधानसभा निवडणुकीआधी शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर राज्यसभा निवडणुकीत वाघेला यांनी काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्याविरोधात भाजपाला मदत केली होती.

COMMENTS