राज्यातील नवनिर्वाचित खासदार भाजपच्या वाटेवर, अमित शाहांची घेतली भेट!

राज्यातील नवनिर्वाचित खासदार भाजपच्या वाटेवर, अमित शाहांची घेतली भेट!

नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहेत. नुकतेच नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतली आहे. त्यामुळे त्या भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना पराभूत करत संसद गाठली आहे. या निवडणुकीत त्यांना काँग्रेस – राष्ट्रवादी महाआघाडीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राणा या आघाडीला पाठिंबा देतील अशी शक्यता होती. परंतु आता त्या जर भाजपमध्ये गेल्या तर आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आपण अमरावतीतील विकासकामांच्या प्रश्नांसाठी अमित शाह यांची भेट घेतली असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. अमरावतीचा विकास या एकमेव मुद्यावर आमची चर्चा झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परंतु त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी ‘बदल होत असतात’ असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राणा या भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे.

COMMENTS