राष्ट्रवादीला धक्का, माजी खासदार भाजपमध्ये जाणार ?

राष्ट्रवादीला धक्का, माजी खासदार भाजपमध्ये जाणार ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला. अजूनही राष्ट्रवादीत गळती सुरु असून कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. धनंजय महाडिक हे पक्षावर नाराज असून ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे. परंतु तरीही महाडिक यांनी भाजपात प्रवेश केला तर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले हे दोखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल उदयनराजे भोसले यांनी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच खासदारकीची पोटनिवडणूक शक्य असेल तर राजीनामा देण्याची तयारीही उदयनराजेंनी दाखवली असल्याची माहिती आहे. त्यामुळे उदयनराजे आणि महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS