आणखी एका पक्षाचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा !

आणखी एका पक्षाचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा !

सांगली – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची ताकद वाढली असून मराठा स्वराज्य संघानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा सेवा संघाचे प्रमुख महादेव साळुंखे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांना भाजपा सरकारने हरताळ फासले असून शिवस्मारकाचे राजकारण केले, भ्रष्टाचार केला, गडकिल्ल्यावर हॉटेल सुरू करण्याचा चुकीचा निर्णय घेतला असल्याची टीका साळुंखे यांनी केली आहे.

तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे अर्ज करून कर्ज मिळत नाही. उद्योग धंदे बंद पडत आहेत, आर्थिक मंदी निर्माण केली आहे. सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ पुराच्या वेळी गायब होते. खोटी बदनामी करून आहे, बहुजन नेत्याना राजकीय दृष्ट्या त्रास दिला जात असल्याचंही मराठा सेवा संघाचे प्रमुख महादेव साळुंखे यांनी म्हटलं आहे..

COMMENTS