फेसबुकवर मुख्यमंत्र्यांना पोस्ट लिहून आणखी एका मराठा तरुणाने केली आत्महत्या

फेसबुकवर मुख्यमंत्र्यांना पोस्ट लिहून आणखी एका मराठा तरुणाने केली आत्महत्या

परभणी- जिल्ह्यातील सेलू येथील दिग्रसवाडीच्या अनंत लेवदे पाटील या तरुणाने फेसबुक वरील आपल्या अकाउंटवरून मुख्यमंत्र्यांना ‘मी मराठा आरक्षण मिळावं म्हणून बलिदान देत असल्याची पोस्ट टाकून दुर्दैवी आत्महत्या केली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहेत. त्यात मराठा तरुणाचं आत्महत्या सत्र थांबताना दिसत नाही. अनेकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्यासारख टोकाचं पाऊल उचल आहे. त्यात आज अनंत पाटील या तरुणाने फेसबुकवर मुख्यमंत्र्यांकडे आपली खंत व्यक्त करत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

आपल्या अखेरच्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय लिहलय अनंत लेवदे पाटील या तरुणाने पहा.

मा.मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आज मी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बलिदान देत आहे. मला आज खूप आनंद होत आहे की मी आपल्या जातीसाठी काहीतरी करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. मला देशासाठी काही करता नाही आले, परंतु मागासलेल्या मराठ्यांसाठी मी प्राणाचे बलिदान देत आहे.

 

COMMENTS