परभणीत शरद पवारांच्या उपस्थितीत आणखी एक बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला!

परभणीत शरद पवारांच्या उपस्थितीत आणखी एक बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला!

परभणी- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीतील आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जाहीर सभा आज परभणीत घेण्यात आली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. या सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत शिवसेनेचे माजी जिल्हा सह संपर्क प्रमुख डॉ. शिवाजी दळणर यांनी प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत दळणर यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
केला. शिवाजी दळणर हे जिल्ह्यातील धनगर समाजाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान यावळी बोलत असताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. जेवढया घोषणा केल्या तितक्या घोषणा मागील 70 वर्षात कुणी केल्या नाहीत. शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही,शेतीमालाला भाव दिलेला नाही, चारा छावण्या नाहीत,प्यायला पाणी नाही, त्यामुळे अशा सरकारला आम्ही सत्तेवरून खाली खेचू असं पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच देशाचे पंतप्रधान यवतमाळ आले पण जवळच्या जिल्ह्यात असलेल्या शहीद झालेल्या सैनिकांच्या घरी गेले नाहीत. मराठवाड्यात विदर्भात शेतकऱ्यांची आत्महत्या होतात.मोठमोठ्या उद्योजकांना कोट्यवधी माफ केले जातात. पण शेतकऱ्यांना मदत केली जात नाही. दरवर्षी दोन कोटी नौकय्रा देतो, काय दिलं,नौकय्रा दिल्या का?,धनगर समाजाला आरक्षण दिलं का ? असा सवालही पवारांनी केला आहे.

आजचे मुख्यमंत्री बारामतीला धनगर समाजाला भेटले
पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षण देतो असं आश्वासन दिलं. मराठा समाजाला सवलती जाहीर केल्या
आणि बंद केल्या. मराठा समाजाला आणि धनगर समाजाला फसवलं मुस्लिमांना सुद्धा फसवलं, खोट्या गोष्टी सांगणाऱ्या सरकारला खाली करा असं आवाहनही यावळी पवारांनी जनतेला केलं आहे.

तसेच मोदी साहेबांचं सरकार आलं, 350 कोटीला मिळणारं विमान आता यांनी 670 कोटीला विकत घेतलं,
अभिनंदन यांना सोडल्याचा गवगवा करता मग जाधव तीन वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहेत, येथे तुमची 56 इंचाची छाती काय करते असा सवालही यावळी पवारांनी केला आहे.

COMMENTS