वन नेशन वन इलेक्शनसाठी आमचा पाठिंबा, पण… – संजय राऊत

वन नेशन वन इलेक्शनसाठी आमचा पाठिंबा, पण… – संजय राऊत

मुंबई – केंद्र सरकार वन नेशन आणि वन इलेक्शनसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच वन नेशन वन इलेक्शनला विरोधकांनी विरोध दर्शवला आहे. तर याबाबत शिवसेनेनंही आपली भूमिका व्यक्त केली असून ‘एकत्रित निवडणुकांसाठी आमची तयारी आहे, पण मग एक देश एक कायदा करण्यात यावा. अशी मागणी केली आहे. तसेच काश्मीरबाबत वेगळी भूमिका का घेतली जाते ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील वन नेशन वन इलेक्शनबाबत आपली प्रतिक्रिया दिली असून आगामी निवडणुकांमध्ये भाजपला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे, त्यामुळेच लोकसभेसह ११ राज्यांच्या निवडणुका घेण्याचे खूळ सरकारच्या डोक्यात आलं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपा आता निवडून येणार नाही याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना भीती वाटते आहे, त्यामुळेच एकत्र निवडणुकांचा घाट घातला जातो असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS