जमीन घोटाळा प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी !

जमीन घोटाळा प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी !

नागपूर – पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुस-या दिवशी विरोधकांनी विधानसभेत चांगलाच गोंधळ घातला असल्याचं पहावयास मिळालं आहे. विधानसभेत सिडको भूखंड घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री स्वतःला आता क्लीनचीट देतील असं आम्हाला वाटत आहे. हा संघटीत कट रचून गुन्हा केला असून याबाबत गुन्हे दाखल करण्याची मागणी विखे-पाटील यांनी केली आहे.

दरम्यान प्रकल्पग्रस्त रांगेत असताना जिल्हधिका-यांना आठ शेतक-यांना भेटण्याचा सल्ला कोणी दिला. तसेच ज्यांना जमिनी दिल्या त्यांना रायगड जिल्हाधिकारी कोण हे माहीत नाही. तसेच ही जमीन सिडको किंवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विकता येऊ शकते हा नियम आहे का असा सवालही यावेळी विरोधकांनी केला आहे. तसेच 2000 कोटींचा घोटाळा झाला असून यात कोणी हात धुवून घेतले याबाबतची चौकशी करण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध आला तर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच हा व्यवहार रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली असून न्यायालयीन चौकशी करुन यामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे का याबाबतची चौकशी होणं गरजेचं असून चौकशी होईपर्यंत  मुख्यमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नसल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

COMMENTS