खरा संभ्रम महाविकास आघाडीपेक्षा विरोधकांमध्येच : जयंत पाटील

खरा संभ्रम महाविकास आघाडीपेक्षा विरोधकांमध्येच : जयंत पाटील

सातारा – महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे.त्यामुळे लोकांमध्ये कोणताही संभ्रम नाही. खरा संभ्रम विरोधकांमध्येच आहे. त्यांना मुद्दे सापडत नसल्याने फडणवीस आणि पाटील एवढाच विषय दिसत आहे. परंतु राज्यासमोर यांच्याशिवायही अनेक विषय आहेत. त्यावर आम्ही काम करत आहोत”, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. पुणे बंगळुरू महामार्गावर जोशीविहीर (ता. वाई) येथे सातारा जिल्हा बँकेच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन आज जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने व मान्यवर उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, “गेल्या वर्षी करोनाचा तडाखा बसला. राज्य सरकारचे एक वर्ष कोरोना आपत्तीतून बाहेर पडण्यात गेले आहे. सरकार आता पूर्ण गतीने कामाला लागले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि घटक पक्ष विकासाला गती देण्याचे काम करत आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षात चांगला समन्वय आहे. राज्यात अनेक वर्षे धरणांची व उपसा सिंचन, कालव्याची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांना चालना देण्याला आमचे प्राधान्य आहे. महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोणताही संभ्रम नाही. खरा संभ्रम विरोधकांमध्येच आहे. त्यांना मुद्दे सापडत नसल्याने फडणवीस आणि पाटील एवढाच विषय दिसत आहे. परंतु राज्यासमोर यांच्याशिवायही अनेक विषय आहेत. त्यावर आम्ही काम करत आहोत”, असंही त्यांनी सांगितलं.

COMMENTS