आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन !

आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन !

मुंबई – आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनादरम्यान कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, मॅग्नेटिक महाराष्ट्र यासह अनेक मुद्दे  गाजणार असल्याचं दिसून येत आहे. तसेच आक्रमक विरोधकांबरोबरच सत्ताधारी बाकावरून शिवसेना काय भूमिका घेते, याबद्दल सरकारपक्ष सचिंत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा एकदा एकत्र आल्यामुळे फडणवीस सरकार अडचणीत येणार असल्याचं दिसत आहे. तसेच आर्थिक निकषांवरच आरक्षण असावे, या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नव्या भूमिकेचेही पडसाद विधिमंडळात उमटणार आहेत.

https://twitter.com/dhananjay_munde/status/967706333473460224

दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला होता. याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन चहापानावर बहिष्कार घातला.  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका करत चहापानावर बहिष्कार घातला आहे.

COMMENTS