नाईकांच्या खेळीने शिवबंधन तोडून नगरसेविकेची घरवापसी

नाईकांच्या खेळीने शिवबंधन तोडून नगरसेविकेची घरवापसी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला गळती लागली आहे. पण आता शिवसेनेत दाखल झालेल्या भाजप नगरसेविकेची घरवापसी झाली आहे. शिवसेनेला रामराम ठोकून नगरसेविका सुरेखा नरबागे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नवी मुंबई महापालिकेत भाजपला गेल्या काही दिवसांपासून चांगलीच मोठी गळती लागली होती. गणेश नाईक यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून अनेक नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. पण आता शिवसेनेत गेलेल्या नगरसेविका सुरेखा नरबागे पुन्हा भाजपमध्ये दाखल झाल्या आहे.

मागील वर्षी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांनी भाजपचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपच्या कविता आगोंडे यांच्यासोबत सुरेखा नरबागे यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे राजीनामा सोपवत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. पण, आता नरबागे यांनी शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

COMMENTS