शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला !

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला !

उस्मानाबाद – राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे. तसं राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहे. उस्मानाबादमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाल्यामुळे जिल्ह्यासह राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. पडोळी (नायगाव) येथे एका तरुणाने हा हल्ला केला असून या हल्ल्यात खासदार ओमराजे निंबाळकर जखमी झाले आहेत.

दरम्यान आज सकाळी ओमराजे निंबाळकर हे
शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ गावात रस्त्यावरून चालत जात असताना ही घटना घडली आहे. एका तरुणाने हातात हात देवून दुसऱ्या हाताने त्याने चाकू हल्ला केला आहे. पोटावर झालेला वार हातावर आणि मनगटावर, हातातील घड्याळवर बसल्याने खासदार निंबाळकर जखमी झाले आहेत. परंतु त्यांची प्रकृती सध्या सुखरूप असल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून हल्लेखोर तरूण पळून गेला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

COMMENTS