उस्मानाबाद – प्रतापसिंह पाटलांना खासदार करण्यासाठी 2 हजार कार्यकर्त्यांचं तुळजाभवानीला साकडं !

उस्मानाबाद – प्रतापसिंह पाटलांना खासदार करण्यासाठी 2 हजार कार्यकर्त्यांचं तुळजाभवानीला साकडं !

उस्मानाबाद – घटस्थापनेतील पाचव्या माळेचा मुहुर्त शोधत डॉ.प्रतापसिंह पाटील मित्रमंडळाच्यावतीने उस्मानाबाद ते तुळजापूर सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांनी चालत जाऊन डॉ.प्रतापसिंह पाटील हे खासदार व्हावेत यासाठी साकडे घालण्यात आले आहे. यावेळी कुणीही मोठा नेता नसताना अतिशय शिस्तीत पण वाजतगाजत जाऊन तुळभवानीला साकडे घातले. यावेळी उस्मानाबाद शहरातुन कार्यकर्ते चालत असताना रस्त्याच्या दुतर्फा बाजुंनी गर्दी केली होती.तुळजापुर येथे चालत गेल्यानंतर तेथे डॉ.प्रतापसिंह पाटील मित्रमंडळाच्यावतीने सामुहिक आरती केली.

यात पायी चालत जाणाऱ्या व डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना फक्त सोशल मिडियातुन आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो युवक व वयस्कर व्यक्ती सहभागी झाले होते. यामध्ये अक्षय चव्हाण,महेश आखाडे,महेश चव्हाण,दिनेश पौळ, पांडूरंग घुले,विकी चव्हाण,शाम गांधले,सचिन मळगे,तानाजी नाईकनवरे,सचिन पाटील,जितेंद्र पाटील,अॕड.योगेश सोन्ने,सचिन कदम,बिजु मातने,प्रमोद ढगे,संपत तांबे,समाधान येडे,समाधान अंधारे,आनंद लहाने,केशव लांडगे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

तसेच बार्शी ते तुळजापुर यादरम्यान देखील संत मिरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य संतोष भांडवलकर,बालाजी गोरे,मनोज शहाणे यांच्यासह २५-३० जणांनी तुळजाभवानीला पायी चालत जाऊन तुळजाभवानीला साकडे घातले.तर बोरगाव धनेश्वरी येथील रामबप्पा सांगळे,दिपक चोरघडे,अमोल चोरघडे,लक्ष्मण चोरघडे यांनीही बोरगाव ते तुळजापूर पायी चालत जाऊन तुळजाभवानीला साकडे घातले.

COMMENTS