उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अर्जुन खोतकर यांची नियुक्ती !

उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अर्जुन खोतकर यांची नियुक्ती !

उस्मानाबाद – जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अर्जुन खोतकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दिवाकर रावते यांच्याकडे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होतं. रावते यांच्यानंतर आता अर्जुन खोतकर हे उस्मानाबादचे नवे पालकमंत्री झाले आहेत.

भाजप- शिवसेनेच्या सत्ताकाळात नांदेड जिल्ह्याच्या वाट्याला तीन वर्षात तीन नवे पालकमंत्री आले आहेत. स्थानिक स्तरावर कसलाही वाद किंबहूना नाराजी उघडपणे चव्हाट्यावर आली नसतांनाही अर्जुन खोतकर यांना नारळ देवून त्यांच्या जागेवर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची नियुक्ती करण्यात होती. कदम हे यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर आता उस्मानाबादच्या पालकमंत्रीपद खोतकरांकडे देण्यात आलं आहे.

COMMENTS