उस्मानाबाद – तुमच्या पतीची राजकीय बदनामी करू, उद्योजक देवदत्त मोरेंच्या पत्नीला धमकी !

उस्मानाबाद – तुमच्या पतीची राजकीय बदनामी करू, उद्योजक देवदत्त मोरेंच्या पत्नीला धमकी !

उस्मानाबाद – कसबे-तडवळे येथील एका उद्योजकाच्या पत्नीला खंडणी मागणाऱ्या दोघांविरोधात शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमच्या पतीची राजकीय बदनामी करू, असा फोन आल्याने या प्रकरणाला राजकीय कलाटणी मिळण्याची चिन्ह आहेत.

मोरे यांच्या पत्नी अर्चना मोरे यांनी शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बाळराजे तौर-पाटील (रा. नवी मुंबई) याने अर्चना मोरे यांना फोन केला. तो म्हणाला ‘मी महिला आयोगातून बोलत आहे. तमुच्या विरोधात बाळराजे तौर-पाटील यांनी तक्रार दिली आहे. तुमच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तुमची राजकीय प्रतिष्ठा संपूण टाकू, अशी धमकी देत दुसरा आरोपी रेखा बापू भालशंकर (रा. पुणे) यांच्यासोबत त्याने संगणमत केले. तसेच रेखा ही तुमच्या पतीची पत्नी असल्याचे सोशल मिडीयावर प्रसारीत करून सदर प्रकरण महिला आयोगात घेऊन जाऊ. तुमच्या नवऱ्याची सीबीआय मार्फत चौकशी करून जेलमध्ये टाकू, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या मुलीची बदनामीकारक पोस्ट टाकून प्रकरण मिटवायचे असेल तर सात ते आठ लाख रुपये द्या, अशी मागणी मोरे यांच्या पत्नीकडे दोन्ही आरोपींनी केली. दरम्यान हा प्रकार म्हणजे माझी राजकीय बदनामीचा प्रकार असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. दोन्ही आरोपींच्या विरोधात शहरातील आनंदनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 5) गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दासरवाड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

COMMENTS