उस्मानाबाद – उद्योजक देवदत्त मोरेंच्या पत्नीला धमकी देणारा आरोपी जेरबंद!

उस्मानाबाद – उद्योजक देवदत्त मोरेंच्या पत्नीला धमकी देणारा आरोपी जेरबंद!

उस्मानाबाद – महिला आयोगाकडून बोलत असल्याचा बनाव करत उद्योजक देवदत्त मोरे यांच्या पत्नीला धमी देणा-या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोरे यांच्या पत्नी अर्चना मोरे यांना 25 कोटीची खंडणी मागितली होती. तसेच तुमच्या पतीविरूद्ध तक्रार आली असल्याचे सांगून प्रकरण मिटविण्यासाठी 25 कोटीची मागणी करून आठ लाख रूपयांची खंडणी मागणार्‍या बाळराजे तौर-पाटील याला अखेर आनंदनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाच्या परिसरात तो आढळून आला.

कसबे तडवळे येथील उद्योजक मोरे यांच्या पत्नीस 1 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत बाळराजे तौर-पाटील याने फोनवर धमकीचे फोन केले होते. महिला आयोगाकडे रेखा भालशंकर यांनी तक्रार दिली आहे. त्यामुळे तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल. तडजोड करून प्रकरण मिटवायचे असेल तर तुम्हा पती-पत्नीचे जगणे अवघड करीन. तुमच्या पतीसा जेलमध्ये टाकून मीडियामध्ये बदनामी करू, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी रेखा भालशंकर, बाळराजे पाटील यांच्याविरुद्ध 5 नोव्हेंबर रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर  जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर अखेर पाचव्या दिवशी सकाळीच तो पोलिसांच्या हाती लागला. त्यास आनंदनगर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. सायंकाळपर्यंत न्यायालयात हजर करण्याची शक्यता असल्याचे तपास अधिकारी एपीआय दासरवाड यांनी सांगितले.

COMMENTS