उस्मानाबाद – जिल्हाध्यक्ष  राजेंद्र गपाट हे सूड भावनेने पदाधिकाय्रांच्या नियुक्त्या करतायत, मनसेच्या शहराध्यक्षाचा आरोप!

उस्मानाबाद – जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट हे सूड भावनेने पदाधिकाय्रांच्या नियुक्त्या करतायत, मनसेच्या शहराध्यक्षाचा आरोप!

उस्मानाबाद – उस्मानाबादमधील मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट हे सूड भावनेने पदाधिकाय्रांच्या नियुक्त्या करत असल्याचा आरोप मनसेच्या कळंब येथील शहराध्यक्ष
पवन वरपे यांनी केला आहे. कळंब येथील मनसेचे शहराध्यक्ष पवन वरपे यांच्या जागी राजेंद्र गपाट यांनी नवीनच पक्षप्रवेश केलेल्या रावण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल राऊत यांची नियुक्ती केली आहे. अमोल राऊत यांनी १९ फेब्रुवारी रोजी अनेक कार्यकर्त्यांसोबत मनसेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेद्र गपाट, महिला आघाडिच्या जिल्हाध्यक्ष वैशाली गायकवाड, सागर बारकुल ,गोपाळ घोगरे,दत्ता मोरे, संजय कोळी, दत्ता बोंदर ,काका जाधव , बंडगर यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान कळंब तालुक्यातील निष्ठावंत पक्ष स्थापनेपासून इमाने-इतबारे काम करत आहेत.परंतु या निष्ठावंत पदाधिकाय्रांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट हे सूड भावनेने पदावरुन काढून टाकत असून त्यांचे नवीन समर्थकांना ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नसताना पदे बहाल केली जात असल्याचा आरोप कळंबचे शहराध्यक्ष पवन वरपे यांनी केला आहे.

COMMENTS