उस्मानाबाद – ‘त्या’ पुस्तकाविरोधात राष्ट्रवादीचं जोरदार आंदोलन! VIDEO

उस्मानाबाद – ‘त्या’ पुस्तकाविरोधात राष्ट्रवादीचं जोरदार आंदोलन! VIDEO

उस्मानाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून देशभरात आंदोलन केलं जात आहे. या पुस्तकाविरोधात उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीनं जोरदार आंदोलन केलं आहे. या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी गोयल यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

हे पुस्तक बाजारात आले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला.जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर तर युवकचे मेहबूब पटेल, शंतनू खंदारे, अमित शिंदे, नंदकुमार गवारे, प्रदीप मुंडे, प्रदीप घोने अशी शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

COMMENTS