राणा जगजितसिंह पाटलांसोबत भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांचं मनोमिलन नाही? पालिकेत दोन गट!

राणा जगजितसिंह पाटलांसोबत भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांचं मनोमिलन नाही? पालिकेत दोन गट!

उस्मानाबाद – आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. यामध्ये पालिकेतील अनेक नगरसेवकही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले. सोमवारी पालिकेची सर्वसाधारण सभा होती. या सभेमध्ये पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे सदस्य एका बाजूला तर भाजपचे जुने आणि सेनेचे सदस्य दुसऱ्या बाजूला असं चित्र पाहायला मिळालं. शिवाय इतर अनेक विषयावरही अशीच जुन्या नव्या नव्याचे दोन गट असल्याचे दिसून आले. त्यामुळे जुने आणि नवीन नगरसेवकांचे मनोमीलन झाले नाही काय? अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात पाहायला मिळत होती. जुना नवा असा संघर्ष उभा राहणार का? याकडे शहरातील नागरिकांची लक्ष आहे.

याबाबत काही नगरसेवकांशी चर्चा केली असता त्यांनी या विषयावर अद्याप आमच्या नेत्यासोबत बैठक झालेली नसल्याचे सांगितले. एकीकडे विद्यमान आमदार पाटील हे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जर शिवसेनेला विरोध केला तर आगामी विधानसभेत शिवसेनेची मते आपल्या पारड्यात पडतील की नाही याची शंका, कदाचीत त्यांना सतावत असेल असेही बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक होईपर्यंत तरी पालिकेत सत्ताधारी- विरोधक असा संघर्ष दिसणार नाही हे यावरून स्पष्ट होत आहे.

COMMENTS