राष्ट्रवादीकडून उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती!

राष्ट्रवादीकडून उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती!

उस्मानाबाद – उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्षपदी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विश्वासू असलेले बिराजदार यांची निवड झाली आहे. आमदार पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा कोणाच्या गळ्यात जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

गेली अनेक वर्ष डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्या हातात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. जिल्हाध्यक्ष अथवा जिल्हा परिषदेतील एखाद्या सदस्याला उमेदवारी देणे असो अशा अनेक बाबी केवळ डॉक्टर पाटील आणि राणा पाटील यांच्याकडूनच दिल्या जात होत्या. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशानंतर विखुरलेली राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात जाणार याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. अखेर बिराजदार यांच्या रूपाने पक्षाला जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे.

आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका असल्याने जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा करिष्मा कसा राहतो याचे मूल्यमापन करूनच पुढील काळात जिल्हाध्यक्षपद बिराजदर यांच्याकडे किती काळ टिकेल याचा अंदाज येणार आहे. यापूर्वीही बिराजदार यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल असा विश्वास वाटल्याने त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकली असल्याचे बोलले जाते. बिराजदार यांचे ऐवजी काही तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली जाते का याकडेही सर्वांचे लक्ष होते. मात्र अखेर बिराजदार यांच्याकडेच जिल्ह्याचे नेतृत्व गेल्याने त्यातील सुरज संपलेली आहे.

COMMENTS