उस्मानाबाद – पक्षादेश डावलल्याने राष्ट्रवादीच्या 17 जिल्हा परिषद सदस्यांवर कारवाई! VIDEO

उस्मानाबाद – पक्षादेश डावलल्याने राष्ट्रवादीच्या 17 जिल्हा परिषद सदस्यांवर कारवाई! VIDEO

उस्मानाबाद – जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत पक्षादेश डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 17 जिल्हा परिषद सदस्यांना पक्षाकडून नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये विद्यमान अध्यक्ष अस्मिता कांबळे यांचाही समावेश असल्याने राजकीय अस्थिरतेची चर्चा रंगली आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी यासंदर्भात ही कारवाई केली आहे.

त्यामुळे पक्षादेश डावलणाऱ्या सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. या सदस्यांना अपात्र करण्याचा यावे याचीही मागणी बिराजदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहेत.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यासह 17 सदस्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. 17 सदस्यांनी मात्र याचे खंडन केले आहे. गटनेत्याच्या आदेशावरून आम्ही मतदान केल्याचे 17 सदस्य सांगत आहेत. त्यामुळे आता या सतरा सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार का याची उत्सुकता लागली आहे.

 

COMMENTS