उस्मानाबाद – का भीती वाटतेय पोलिसांना पुजा मोरेची ?, का ही हुकूमशाहीची ठिंणगी आहे ?

उस्मानाबाद – का भीती वाटतेय पोलिसांना पुजा मोरेची ?, का ही हुकूमशाहीची ठिंणगी आहे ?

उस्मानाबाद – पुजा मोरे या युवतीच्या आवाहनाने सत्ताधारी भाजपसमोर नवी आवाहने उभी राहिली आहेत. त्याच हेतूने उस्मानाबाद शहरात पुजा मोरे या युवतीला पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. का भिती वाटतेय पुजाची पोलिसांना, शिवाय सरकारलाही….?

पुजा मोरे हिने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आवाहन दिल्यानंतर सोशल मीडियात पुजाची हवा सुरू झाली. अनेकांनी तिच्या या कार्याची दखल घेत तिला प्रोत्साहन दिले आहे. शिवाय तिनेही शासनाच्या विरोधात आंदोलन तीव्र करताना अनेक जिल्ह्यात बैठका सुरू केल्या आहेत. याच हेतूने तिने उस्मानाबादमध्ये येऊन संघटनात्मक बांधणीसाठी दौरा केला. पण, तिच्या दौऱ्याचा पोलिसांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून आले आहे.

पुजाची भीती पोलिसांना की शासनाला ?

मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा अनेक जिल्ह्यात गेली. तशी ती उस्मानाबादमध्येही आली होती. उस्मानाबाद (कौडगाव) औद्योगिक वसाहतीत टेक्स्टाईल टेक्नो पार्कची घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या घोषणेने अनेकांना सुखद धक्का बसला. त्यांची घोषणा ऐकायलाही चांगली वाटली. अशाच घोषणा गेल्या १५ वर्षांपासून जिल्हा ऐकतोय. पण, औद्योगिक वसाहतीत
दगड-मातीशिवाय काही दिसत नाही. असो, पण मुख्यमंत्र्यांची घोषणा जिल्ह्यातील अनेकांना ऐकायला चांगली वाटली. याशिवाय त्यांचे भाषणही कौतुक करण्यासारखेच होते. आमच्यासह अनेकांना त्यांच्या अनेक गोष्टी चांगल्या वाटल्या. त्यामुळे त्या आम्ही ऐकल्याही. आता या सत्ताधाऱ्यांच्या बाजूच्या बातम्या ऐकायला चांगले वाटले. पण, पुजानेही काही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडणे, आंदोलन करणे हा स्वातंत्र्याचा भाग आहे. तसा तो सर्वांनाच मिळाला आहे. मग, एका
युवतीने केलेल्या आंदोलनाचा एवढा धसका का घ्यावा लागतोय ? का तिला ताब्यात घ्यावसं वाटतय ? तिचं काही चुकले तर तिला नजरकैदेत ठेवायचे. पण, तिला तिचे काम करु द्यायचे ना ! का ही हुकूमशाहीची ठिंणगी म्हणावी लागतेय ? समजा तुमचे काहीच चुकत नाही, जनतेसाठी तुम्ही अहोरात्र विकासकामे करतात. तर मग तिला बोलू द्या ना! कशासाठी तिचा आवाज दाबताय ? अहो, तुमच्या विकासाच्या झंजावातात, कोण ऐकणार आहे तिचे. मग, कशाला पोलिसांनाही अंगावर सोडताय ? अन पोलिसही तशाच वृत्तीचे. जसे काही ती सराईत दरोडेखोर आहे. शहरात दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. तिथे चोरांचा शोध घेण्यासाठी अक्कल लावावी, असे वाटत नाही का पोलिसांना. हुशार असलेल्या माणसांनी मेंढराच्या कळपातील वागणे सोडून द्यायला पाहिजे. अरे तुमची बहिण असती तर अशाच पद्धतीने झटापट केली असती का ? त्या संबंधीत अधिकाऱ्याने कोणता कागद दाखविला का, अटक वॉरंट होते का? पण, अशा पद्धतीने झटापट करीत गाडीत बसवून आवाज दाबला तर त्यातून उद्रेकच होत असतो. जर पुजा मोरे पासून धोका होता तर तिला नजरकैदेत ठेवायचे. १० – १५ पोलिस तिच्यावर पाळत ठेवायची. अशा पद्धतीने तिच्याशी झटापट म्हणजे आवाज दाबण्याचा प्रयत्न नाही तर काय आहे. अहो अशा
पद्धतीने राज्य चालविणे म्हणजे हुकूमशाहीची नांदी म्हणावी लागेल.

प्रत्येकाच्या मनात देशप्रेम हे असायलाय पाहिजे. ३७० वे कलम रद्द झाले, ते चांगलेच झाले. त्यासाठी कोणीही सत्ताधाऱ्यांचे कौतुक करेलच. करायलाच पाहिजे. पण, केवळ कलम रद्द झाले म्हणजे शेतमालाला हमीभाव मिळाला असे नाही. संपूर्ण देशात सत्ता असल्याने ३७० वे कलम रद्द करता आले. तसे स्वामीनाथन आयोगही लागू करता येऊ शकतो. का तिथे कोणी हात धरलाय ? अहो सातवा, आठवा नाही तर १५ वा वेतन आयोग लागू करा. त्याचे काही नाही. पण, स्वामीनाथ आयोगाकडे दुर्लक्ष का ? हीच तर अपेक्षा घेऊन पुजा आंदोलन करतेय. मग, तिचे काय चुकलेय. का तिचा आवाज दाबताय. का तिची तुम्हाला भीती वाटतेय?

COMMENTS