उस्मानाबाद – राणाजगजीतसिंह पाटलांनी माझ्या डोक्याला बंदूक रोखली, ‘या’ नेत्यानं केला आरोप!

उस्मानाबाद – राणाजगजीतसिंह पाटलांनी माझ्या डोक्याला बंदूक रोखली, ‘या’ नेत्यानं केला आरोप!

उस्मानाबाद – जिल्ह्यातील कळंब पंचायत समितीच्या निवडणुकीवरून चांगलाच राडा झाला आहे. कळम पंचायत समिती मध्ये एकूण 16 सदस्य आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दहा, तर सहा सदस्य शिवसेनेचे आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळा खुर्द येथील सदस्य गुणवंत पवार गेल्या अनेक दिवसापासून नाराज होते. शिवसेनेकडून कळंब पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. शुक्रवारी रात्रीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना शिवसेनेच्या गटाने सहलीवर पाठवले.

यामध्ये गुणवंत पवार, डिकसळ आणि हसेगाव येथील दोन सदस्य असे एकूण तीन सदस्य होते. माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगाव गावात हे सर्व सदस्य थांबले होते. त्याच वेळी आमदार राणा पाटील यांच्यासह काही पक्षाचे कार्यकर्ते तिथे आले. आमचे सदस्य द्या, अशी मागणी करू लागले. माझ्या डोक्याला बंदूक लावल्याचा आरोप हिंमतराव पाटील यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर केला आहे.

यावेळी दोन्ही गटाकडून झटापटी झाल्या. धमकी देऊन मारहाणीचे प्रकार घडल्याने अकलूज पोलिस ठाण्यात आमदार पाटील यांच्यासह 18 जनावर ती गुन्हे दाखल झाले आहेत. मंगळवारी पंचायत समिती सभापतीची निवड प्रक्रिया होत आहे. त्यामुळे आता पंचायत समिती कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

COMMENTS