उस्मानाबाद – अजित पिंगळेंना तिकीट न दिल्यास माझी गाठ शिवसेनेशी, माजी आमदाराचं पक्षनेतृत्वाला खुले आव्हान!

उस्मानाबाद – अजित पिंगळेंना तिकीट न दिल्यास माझी गाठ शिवसेनेशी, माजी आमदाराचं पक्षनेतृत्वाला खुले आव्हान!

उस्मानाबाद – कळंब विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची दावेदारी जोरात सुरू झाली आहे. बुधवारी कळंब शहरात उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्या
वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दोन माजी आमदार व तालुकाप्रमुख यांनी कार्यकर्ते मेळाव्यामध्ये
प्रमुख उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. पिंगळे यांना तिकीट नाही दिले तर गाठ माझ्याशी आहे, असे खुले आव्हान
थेट माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी पक्षनेतृत्वाला दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे सेनेचे खासदार प्रा. गायकवाड यांच्या उपस्थितीत असे आवाहन दिल्याने पाटील यांना खासदारांचे बळ असल्याची चर्चा सेनेचया गोटात चर्चिली जात आहे. कळंब तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावात सच्चा शिवसैनिक तयार झालेला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये कळंब तालुक्यातून पाहिजे त्या प्रमाणात उमेदवाराला मताधिक्य मिळालेली नाही, याचे मुख्य कारण म्हणजे माजी आमदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि स्थानिक नेते व कार्यकर्ते यांच्यातील गटबाजी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद – कळंब विधानसभा मतदारसंघातून अनेक नेते आपली दावेदारी दाखवत आहेत. प्रत्येक नेता आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करत आहे.

कळंब तालुक्यात पिंगळे यांची ताकद मोठी आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांना देण्याची मागील काही दिवसापासून होत आहे. याप्रसंगी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील म्हणाले की, कार्यक्रमाला ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित राहण्याला हव होतं. पण राहिले नाहीत त्यामुळे यांचे कोणाविषयी किती प्रेम आहे हे दिसून येते. या तालुक्याने अनेकांना आमदार केल.आता उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांना गुलाल लावला पाहीजे. अजितच्या तिकिटात यावर्षी कोणतीही गडबड झाली तर माझी अन् शिवसेनेचे गाठ आहे. असा इशारा यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला.

माजी आमदार दयानंद गायकवाड म्हणाले की खिशात एक रूपया नव्हता तरीही मी आमदार झालो. अजित पिंगळे यांनी माझ्यासाठी पक्षासाठी खुप केल. अजितचा वाढदिवस 2020 ला करू. आपण सर्व उपस्थित असु आणि त्यावेळी अजित दादा आमदार असेल. तसेच माजी जिल्हाप्रमुख नरसिंग जाधव नंतर कळंब तालुक्यात शिवसेना टिकवली आहे त्यात अजित पिंगळे याचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यामुळे आगामी काळात सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान अस असल तरी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना त्यांच्या स्वतःच्या तिकीटाची खात्री आहे का, असा प्रश्न काही
शिवसैनिकांतून विचारला जात आहे.

COMMENTS