उस्मानाबाद – शिवसेना जिल्हाप्रमुखांची कोंडी करण्याचा प्रयत्न,  सारोळ्यात  भाजप नेत्यांच्या ‘जोरबैठका’ !

उस्मानाबाद – शिवसेना जिल्हाप्रमुखांची कोंडी करण्याचा प्रयत्न,  सारोळ्यात  भाजप नेत्यांच्या ‘जोरबैठका’ !

उस्मानाबाद – शिवसेनचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. राष्ट्रवादीत योग्यता असतानाही त्यांना डावलून एका नेत्याच्या मुलाला जिल्हा परिषदेचं तिकीट देण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेल्या कैलास पाटील यांनी शिवसेनेचा भवगा खांद्यावर घेत हातात शिवबंधन बांधलं. त्यानंतर त्यांना शिवसेनेकडून जिल्हा परिषदेचं तिकीटंही मिळालं. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या मुलाच्या त्यांनी पराभव करुन जिल्हा परिषदेत सहज विजय मिळवला. तिथून त्यांच्या सुरू झालेल्या प्रवास त्यांना नुकतचं शिवसनेचं जिल्हा प्रमुख पदही देऊन गेलं.

विशेष म्हणजे त्यांच्या निवडीला पक्षातील अन्य कोणीही विरोध केला नाही, हे विशेष. तसे अन्य पक्षातून नवीन पक्षात आल्यानंतर अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचे सांगत बंडाळी उफाळून येते. परंतु, पाटील यांचे स्वतःचे कर्तत्व तसेच अन्य कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची पद्धतीमुळे त्यांना विरोध झाला नाही. अशा स्थितीत जिल्ह्यातही सेनेची ताकद वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे.

त्यांच्या या पक्षविस्ताराच्या कार्याची अन्य पक्षातील नेत्यांना तशी खुपनारी नसणारच.  त्यामुळे कैलास पाटील यांच्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व पक्ष  त्यांच्याविरोधात उभे राहिले. जिल्ह्यातील नेत्यांकडून गावात त्यांच्याविरोधात ताकद देण्याचा प्रयत्न केला. त्यातून सारोळा ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यातून हिरावून घेतली. विशेष म्हणजे त्यात भाजपचाही समावेश होता. आता पुन्हा एकदा भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जिल्हाप्रमुखाचे गावात (सारोळा) येथे ताकद वाढवित आहेत. आमदार ठाकूर यांनी नुकतेच सारोळ्यात येऊन अत्यधुनिक जिमचे उद्दघाटन केले. यामाध्यमातून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे.

COMMENTS