उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारीणी जाहीर ! वाचा कोणत्या गटाची झाली सरशी !

उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारीणी जाहीर ! वाचा कोणत्या गटाची झाली सरशी !

उस्मानाबाद – शिवसेनेच्या उस्मानाबाद जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या गटातील कैलास पाटील यांची उस्मानाबाद जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मतोश्रीहून जाहीर झालेल्या या कार्यकारिणीत जिल्ह्यासाठी दोन जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आले असून राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले कैलास पाटील यांच्यासह गौतम लटके यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

माजी जिल्हाप्रमुख अनिल खोचरे यांची सहसंपर्कप्रमुख तर दत्ताअण्णा साळुंखे यांची जिल्हासमन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. तसेच परांडा, भूम, वाशी, कळंब साठी उपजिल्हाप्रमुख पदी दत्ता मोहिते आणि अजित पिंगळे यांची तर उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा या तालुक्यांसाठी विजयकुमार सस्ते आणि राजाभाऊ पडवळ यांची निवड करण्यात आली आहे. सतीशकुमार सोमाणी, उस्मानाबाद, शिवाजी कापसे, कळंब तर जगन्नाथ गवळी यांची तुळजापूर तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एकंदरीतच या नियुक्त्या पाहिल्या तर माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या गटानी बाजी मारली असच दिसून येतं. जिल्हाप्रमुख पदासाठी खासदार रवींद्र गायकवाड यांचे खंदे समर्थक मानले जाणारे अजित पिंगळे हे इच्छुक होते, आणि खासदारांचे निकटवर्तीय असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात होती परंतु पिंगळे यांची उपजिल्हाप्रमुख पदी फेरनिवड करण्यात आली आहे. यापूर्वीही अजित पिंगळे यांना ओमराजे यांनी तालुकाप्रमुख पदावरून काढून त्याजागी आपले समर्थक रामलिंग आव्हाड यांची नियुक्ती केली होती त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सूर उमटले होते. गेल्या महिन्यात युवासेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांच्या अधिपत्याखाली येणारे काही तालुके काढून घेण्यात आले होते. या नव्या कार्यकारणती खासदार रवी गायकवाड गटाला मात्र फारशी संधी मिळालेली नाही.

COMMENTS