“मंत्रिमंडळात स्थान देणे ही मतदारसंघातील जनतेची जबाबदारी नव्हती, सावंत साहेब हे बरंं नव्हे !”

“मंत्रिमंडळात स्थान देणे ही मतदारसंघातील जनतेची जबाबदारी नव्हती, सावंत साहेब हे बरंं नव्हे !”

उस्मानाबाद – माजी मंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांनी परंडा विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. विधासभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत महाआघाडीचे सरकार सत्तेत आले. यामध्ये माजीमंत्री आमदार प्राध्यापक सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांची ही नाराजी सहाजिकच होती. विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिकांना प्राध्यापक सावंत यांच्या मंत्रिमंडळात समावेश होईल, अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण होऊ न शकल्याने आमदार प्राध्यापक सावंत गेल्या अनेक दिवसापासून फारसे सक्रिय दिसत नाहीत. गेली वर्षभर याबाबत दबक्या आवाजात कुजबूज सुरू होती. मात्र गेल्या दहा पंधरा दिवसात परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. तालुक्यातील खंडेश्वरवाडी प्रकल्पला भेगा पडल्याने सांडवाद्वारे पाणी काढून देण्यात आली आहे.

त्यामुळे नदीकाठच्या आणि परिसरातील अनेक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आला आहे. स्थानिक आमदार म्हणून या नागरिकांना दिलासा देणे, स्थलांतरित केल्यानंतर त्यांना सर्व सुविधा मिळतात का ते पाहणे, याची जबाबदारी सहाजिकच आमदार म्हणून त्यांच्यावर येते. मात्र प्राध्यापक सावंत हे विस्थापितांना भेटण्यासाठी जाऊ शकले नाहीत, गेली नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळे या प्रकाराची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. जनतेतून निवडून येणे हे तसं सोपं नाही. परांडा, वाशी आणि भूम तालुक्यातील जनतेने भरभरून मते देत प्राध्यापक सावंत यांना आमदारकी दिली. मात्र मंत्रिमंडळात स्थान देणे हे तालुक्यातील किंवा मतदारसंघातील जनतेची जबाबदारी नव्हती. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे काम होतं. त्यामुळे आमदार प्राध्यापक सावंत यांची नाराजी ही वरिष्ठ नेत्यांवर असायला हवी.

मतदारसंघातील मतदारावर नाराजी व्यक्त करून चुकीची गोष्ट होत असल्याची राजकीय चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे. तालुक्यातही दुसरा एक प्रकल्प काळेवाडीचा फुटला आहे. तसेच तालुक्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाली आहे. मात्र या नुकसानीकडे आमदार प्राध्यापक सावंत फिरकलेले नाहीत. पक्षातील वरिष्ठ नेते मंडळीवर नाराजी व्यक्त करण्याच्याऐवजी मतदारसंघातील मतदारावर नाराजी व्यक्त करणे चुकीचे, असल्याची चर्चा कार्यकर्ते करीत आहेत. एकीकडे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधातील अनेक आजी-माजी मंत्री पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मदतीचा भाग पुढे असला तरी अशा कठीण प्रसंगी, संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असते.

त्याच उद्देशाने आजी-माजी मंत्री जिल्ह्यासह विविध तालुक्यात फिरत आहेत. नुकसानीची पाहणी करून जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र आमदार प्राध्यापक सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात फारसे सक्रिय नाहीत. शिवाय अतिवृष्टी नंतरही त्यांनी मतदारसंघात आणि तालुक्यात जाऊन पाहणी केली नसल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार राहुल मोठे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे परांडा विधानसभेतील मतदार ‘सावंत साहेब हे बरं नव्हे’ अशी चर्चा करू लागले आहेत.

COMMENTS