उस्मानाबादमध्ये समाजकल्याण सभापतींच्या चिरंजीवाची जिल्हा परिषदेत दादागिरी !

उस्मानाबादमध्ये समाजकल्याण सभापतींच्या चिरंजीवाची जिल्हा परिषदेत दादागिरी !

उस्मानाबाद – जिल्हा परिषदमध्ये एका समाजकल्याण विभागाच्या कर्मचाय्राला अनधिकृत काम करण्यासाठी फोन करुन धमकी देत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हा परिषदेतील समाजकल्याण सभापती सौ चंद्रकला भिमराव नारायणकर यांचा मुलगा विष्णू नारायणकर याने समाजकल्याण विभागातील समाज कल्याण निरीक्षक धनाजी विश्वनाथ माने यांना सभापती यांचे स्वीय सहाय्यक पवार यांच्या फोनवर अर्वाच्च भाषा वापरुन दमदाटी केली आहे. या घटनेची तक्रार माने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

समाजकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. निवेदनामध्ये श्री माने यांनी असे म्हटले आहे की त्यांच्याकडे समाज कल्याण निरीक्षक म्हणून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, या योजनेचा कार्यभार असून श्री विष्णू नारायणकर यांनी दिनांक 11/ 11 /2019 रोजी दुपारी 12:43 मिनिटानी चंद्रकला नारायणकर यांचे पि. ऐ.पवार यांच्या फोनवरून शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच नारायणकर यांचे काम न केल्यास बघून घेईन. तुला खूप महागात पडेल, अशी वारंवार धमकी देत शिवीगाळ केल्याची माहिती तक्रारीत नमूद केले आहे. दबाव टाकून बोगस काम करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी माहीती माने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. वास्तविक सन 2019- 20 या आर्थिक वर्षात पंचायत समिती विकासकामांचे प्रस्ताव मागणी करण्यात आलेली असून अद्याप प्रस्ताव पुरेसा प्राप्त झालेला नाही. कुठलेही अधिकार नसताना व प्रस्ताव नसताना माझा कार्यकाळ संपत आलेला आहे.तरी मी सांगेन त्या गावाचे विकास कामाची यादी तयार करून दे असे म्हणून सातत्याने वेळी-अवेळी माझ्या घरी देखील फोन करून विष्णु नारायकर हे चुकीचे नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकत आहेत. सरकारी कामात अडथळा निर्माण करीत आहेत.

तरी सदर व्यक्ती पासून माझ्या जीवितास धोका असून संबंधितांवर तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. सदर घटना ही अतिशय निंदनीय असल्यामुळे या घटनेचा उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेतील कर्मचार्याकडून तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच अशा प्रकारचे काही गुंडगीरी करणार्या पुढार्यांच्या व नातेवाईकांच्या दबावाला बळी पडून या विभागामार्फत अनेक खोटे कामे केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामूळे या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकारी आशा प्रकाराला पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS