त्यांनी आपल्या कुटुंबाला वाचवावे, संविधान वाचवण्यासाठी आम्ही सक्षम – असदुद्दीन ओवेसी

त्यांनी आपल्या कुटुंबाला वाचवावे, संविधान वाचवण्यासाठी आम्ही सक्षम – असदुद्दीन ओवेसी

औरंगाबाद येथे बहुजन वंचित विकास आघाडीची पहिली जाहीर सभा आज पार पडली. भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम या दोन्ही पक्षांचे नेते आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज्यात सध्या संविधान बचावच्या घोषणा दिल्या जात आहेत. जे लोक राज्यात अशा घोषणा देत आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाला वाचवावे संविधान वाचवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान मोदी सरकारमुळे वंचित, बहुजन पीडितांवर अन्याय केला आहे. परंतु आता वंचित, दलित बहुजनांमध्ये एकीचं बळ दिसेल. राज्यघटना आरएसएस, मोदींनी दिलेली नाही, गांधी परिवार आणि पवारांनी दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी संविधान बचावच्या घोषणा देऊ नयेत. आम्ही संविधान वाचवण्यासाठी सक्षम आहोत. असं ओवैसी यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच बाबासाहेबांनी देशाला घटना दिल्यानंतर सर्वांना सांगितले की, तुम्हाला चार गोष्टी स्वतः लढून मिळवायला हव्यात. त्या म्हणजे स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय. मात्र, सध्या या गोष्टी कुठे आहेत. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे मोदींच्या विचारांपासून आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असा होतो, देशापासून स्वातंत्र्य नव्हे. नाहीतर लोक आम्हाला देशद्रोही समजतील असंही यावेळी ओवेसी यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS