असदुद्दीन ओवेसींचं भाजप, काँग्रेसला मोठं आव्हान !

असदुद्दीन ओवेसींचं भाजप, काँग्रेसला मोठं आव्हान !

हैदराबाद – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासूनच ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीला चांगलीच रंगत चढणार असल्याचं दिसत आहे. एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस आणि भाजपला आव्हान केलं आहे. आगामी लोकसभा निवडणूक हैदराबादमधून लढवून मला हरवून दाखवा असं आव्हान ओवेसी यांनी केलं आहे. तसेच भाजपच्या मोदी आणि शाह यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून जिकून दाखवावं असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान हैदराबादमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे आव्हान केलं आहे. काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन माझ्याविरोधात लढले तरी ते मला हरवू शकणार नाहीत असा विश्वास ओवेसी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी आगामी निवडणूक हैदराबादमधून लढवून त्यामध्ये मला हरवून दाखवावे असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे ओवेसी यांचं हे आव्हान काँग्रेस आणि भाजप स्वीकारणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS