अमित शाहांना एमआयएम मुक्त नाही तर मुस्लीम मुक्त देश हवाय – असदुद्दीन ओवैसी

अमित शाहांना एमआयएम मुक्त नाही तर मुस्लीम मुक्त देश हवाय – असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली – भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार टीका केली आहे. अमित शाह यांना एमआयएम मुक्त नाही तर मुस्लीम मुक्त देश हवा असल्याचं ओवैसी यांनी म्हटलं आहे. अमित शाह म्हणतायत मजलिस मुक्त देश करायचाय. परंतु त्यांना मजलिस मुक्त नाही तर मुस्लीम मुक्त देश करायचा असल्याची जोरदार टीका ओवेसी यांनी केली आहे. ते तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलत होते.

दरम्यान यावेळी ओवेसी यांनी काँग्रेस, तेलगू देसमवरही हल्ला चढवला आहे. भाजपसह या कोणत्याही पक्षाची सत्ता आली तर तेलंगणाचे सरकार दिल्ली, आंध्र प्रदेश, नागपूर येथून चालेल असही यावेळी ओवेसी यांनी म्हटलं आहे. तेलंगणात 7 डिसेंबरला मतदार होणार आहे. त्यामुळे याठिकाणी जोरदार राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS