भारतीय वैमानिक अभिनंदन यांची उद्या सुटका करणार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानची घोषणा !

भारतीय वैमानिक अभिनंदन यांची उद्या सुटका करणार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानची घोषणा !

लाहोर – भारतीय वैमानिक अभिनंदन यांची उद्या सुटका कऱण्यात येणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं म्हटलं आहे. शुक्रवारी सकाळी वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान अभिनंदन यांची तात्काळ सुटका करुन त्यांना भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती. त्यानंतर अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांना उद्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

COMMENTS