लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीला आणखी एका पक्षाचा पाठिंबा!

लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीला आणखी एका पक्षाचा पाठिंबा!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज सीपीएमने पालघर लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला समर्थन देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीची ताकद वाढली आहे.

दरम्यान या मतदारसंघात सी.पी.एमचे एक लाख मतदार आणि कार्कर्ते असून 2019 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाड़ी बरोबर ते राहणार आहेत. आज पत्रकार परिषदेत सी.पी.एम. चे नेते कॉमरेड डॉ. ढवले, कॉमरेड मांगात, पॉलिट ब्यूरो सदस्य, सी.पी.एम. चे सर्व जिल्हा परिषद सदस्य, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकुर, कार्यकारी अध्यक्ष राजीवजी पाटिल, तथा अन्य गणमान्य बविआचे कार्यकर्ते, तथा बवीआचे जिल्हा परिषद सदस्य यांच्या समवेत अधिकृत घोषणा करण्यात आली. इथे दोन्ही पक्षांचे मनोमिलन झाले असून या पुढील ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका एकत्र लढवू असे सांगण्यात आले.

COMMENTS