ब्रेकिंग न्यूज – पालघरमधून भाजपचे राजेंद्र गावित 44 हजार मतांनी विजयी !

ब्रेकिंग न्यूज – पालघरमधून भाजपचे राजेंद्र गावित 44 हजार मतांनी विजयी !

पालघर – पालघर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. सुमारे 44 हजार मतांनी  त्यांनी विजय मिळवला आहे. याबाबत अधिकृत घोषणा अजून झाली नसली तरी सूत्रांच्या हवाल्यानं टीव्ही 9 नं ही बातमी दिली आहेत. गावित यांना 2 लाख 63 हजार मते मिळाली आहेत. दोन नंबरवर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा राहिले आहेत. तर बविआचे बळीराम जाधव तिस-या क्रमांकावर फेकले आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रादीचे उमेदवार 21 हजार मतांनी आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे.

तर उत्तर प्रदेशातील कैरानामध्ये राष्ट्रीय लोक दलाचे हुसेन  या तब्बल 55 हजार मतांनी आघाडीवर आहेत. हुसेन यांना सपा, बसपा आणि काँग्रेस या पक्षांचा पाठिंबा आहे. भाजपचे खासदार हुकुमसिंग यांच्या निधनामुळे या ठिकाणी मतदान होत आहे. लोकसभेच्या चार जांगावरील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या चारही जागा यापूर्वी भाजपकडे होत्या. त्यामुळे त्या सर्व जागा राखण्याचं मोठं आव्हान भाजपपुढे आहे. महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया आणि पालघर, उत्तर प्रदेशातील कैराना आणि नागालँडमधील एक जागेचा या मध्ये समावेश आहे. गेल्या चार वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे 2014 मध्ये भाजपकडे असलेल्या 282 खासदारांची संख्या 272 वर आली

आहे

COMMENTS