पालघरमध्ये महाआघाडीचा उमेदवार ठरला, बविआ’कडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर!

पालघरमध्ये महाआघाडीचा उमेदवार ठरला, बविआ’कडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर!

पालघर – पालघर लोकसभा मतदारसंघासाठी महाआघाडीचा उमेदवार ठरला आहे. ही जागा महाआघाडीने हितेंद्र ठाकूर यांच्या ‘बहुजन विकास आघाडी’ला सोडली आहे. त्यामुळे ‘बविआ’कडून माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज (मंगळवार) उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे अखेरच्या क्षणी बविआनं माजी खासदार बळीराम जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे.

दरम्यान बहुजन विकास आघाडीकडून तिघा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये माजी राज्यमंत्री मनिषा निमकर, माजी खासदार बळीराम जाधव, टीडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे आघाडीच्या बळीराम जाधव यांचा सामना युतीच्या राजेंद्र गावित यांच्याशी होणार आहे. तसेच पालघरमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजेच सोमवार 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.

COMMENTS