पालघरमध्ये शिवसेनेला धक्का, अनेक शिवसैनिक बंडखोरीच्या तयारीत !

पालघरमध्ये शिवसेनेला धक्का, अनेक शिवसैनिक बंडखोरीच्या तयारीत !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पालघरमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण नगरपरिषदेच्या निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकांना डावलून राष्ट्रवादीतून आयत केलेल्या 10 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत असून बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयाकडे धाव घेतली आहे.

दरम्यान सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असून पालघर लोकसभा मतदारसंघ श्रीनिवास वनगा यांच्यासाठी भाजपाने शिवसेनेला सोडला आहे. अशातच   अनेक शिवसैनिक बंडखोरीच्या तयारीत असल्यामुळे शिवसेनेला नगरपरिषद निवडणुकीसह लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

COMMENTS