पालघर नगरपरिषदेत महायुतीचा विजय, नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा !

पालघर नगरपरिषदेत महायुतीचा विजय, नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा !

पालघर – पालघर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महायुतीने 21 जागांवर विजय मिळवला आहे. परंतु नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ.उज्ज्वला काळे यांनी बाजी मारली असून त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार श्वेता पटील यांचा पराभव केला आहे.नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे राष्ट्रवादीतून आलेल्या श्वेता मकरंद पाटील, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला केदार काळे आणि शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार अंजली पाटील रिंगणात होत्या. राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीच्या उज्ज्वला काळे यांनी 1069 मतांनी विजय मिळवला.

दरम्यान नगरपरिषदेच्या 28 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचा प्रत्येकी एक-एक उमेदवार  बिनविरोध निवडून आला होता. त्यामुळे 26 जागांवर निवडणूक लढवण्यात आली होती. यामध्ये महायुतीतील शिवसेनेला 14, तर भाजप ,7 जागा मिळाल्या आहेत. तसेच महाआघाडीतील राष्ट्रवादीला 2, तर  5 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

COMMENTS