पालकमंत्री विष्णू सवरांच्या मतदारसंघात भाजपला मोठा धक्का !

पालकमंत्री विष्णू सवरांच्या मतदारसंघात भाजपला मोठा धक्का !

पालघर – आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. पालकमंत्री विष्णू सवरा यांचा मतदारसंघ असणा-या पालघरमधली अनेक कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या स्वीय सहायकांवर या पदाधिकाऱ्यांचा रोष आहे. सवरा यांचे स्वीय सहायक वसंत सावंत यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.’सावंत आमचे फोनही घेत नाहीत आणि कार्यकर्त्यांची कामेही करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं या पदाधिका-यांनी म्हटलं आहे. या पदाधिका-यांनी राजीनामा दिल्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पालघरमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

COMMENTS