पंढरपूर मंदिर समितीत आता अध्यक्षांच्या जोडीला सहअध्यक्ष !

पंढरपूर मंदिर समितीत आता अध्यक्षांच्या जोडीला सहअध्यक्ष !

            पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीवर सहअध्यक्ष हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंदिर समितीच्या अध्यक्षपदी अतुल भोसले यांच्या निवडीनंतर वाद निर्माण झाला होता. त्यावरुन वारकरी लोकांना आंदोलनही केलं होतं. त्यावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं दिसून येतंय. वारकरी सांप्रदाय लोकांना नाराजी कमी करत खूश करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

            श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील धार्मिक विधी पार पाडण्यासाठी समितीच्या अध्यक्षांसह वारकरी संप्रदायाच्या चालीरिती व प्रथांची जाण असणाऱ्या अनुभवी सदस्याच्या नियुक्तीसाठी सहअध्यक्ष पदाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या पदाच्या निर्मितीमुळे मंदिराचे व्यवस्थापन आता अधिक सुलभ होणार आहे. यासाठी पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 मधील कलम 21 (1) क मध्ये सुधारणा करण्यासह सुधारणा केली.

COMMENTS