राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचं विठूरायाला साकडं!

राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचं विठूरायाला साकडं!

पंढरपूर – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. पहाटे तीन वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेही महापूजेला उपस्थित होते.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठूरायाला साकडं घातलं. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगाला कोरोनाच्या विळख्यातून लवकरात लवकर मुक्त कर. तसेच राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो आहे. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचे बळ द्या” अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठू माऊलींच्या चरणी केली.

COMMENTS