विरोधी पक्षनेते केवळ विधान परिषदेत भाषणे करतात, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला !

विरोधी पक्षनेते केवळ विधान परिषदेत भाषणे करतात, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला !

बीड – ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. आज बीड येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते. यावरुन पंकजा मुंडे यांनी या दोन्ही नेत्यांना कोपरखळी हाणली आहे. विरोधी पक्षनेते केवळ विधान परिषदेत भाषणे करतात. एकाही जिल्हा नियोजन समिती बैठकीत त्यांनी उपस्थिती लाऊन प्रश्न मांडले नाहीत. राजकारण सोडून जिल्ह्याच्या प्रश्नांना त्यांनी वेळ द्यावा. तर, मेटेंबाबत ‘तो त्यांच्या सेन्सॅरिटीचा प्रश्न असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जिल्ह्यातील शिवसेनेचा दुष्काळ संपविण्याच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आवाहनाबाबत ‘त्यांना शुभेच्छा असून राष्ट्रवादी कमी होऊन जिल्ह्यात शिवसेना वाढली तर हरकत नाही. मात्र, भाजप कमी होणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळेच मागचे चार वर्षे टंचाई जाणवली नाही, पाण्यासाठी टँकर लागले नाहीत. यंदा निसर्गानेच अवकृपा केली त्यामुळे टंचाई जाणवत आहे. जलयुक्त बाबत विरोधकांची टीका अभ्यासशुन्य असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. यावेळी खासदार डॉ. प्रितम मुंडे आणि जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह उपस्थित होते.

COMMENTS