मंचावर पंकजा मुडेंचे आव्हान धनंजय मुंडेंनी स्विकारले

मंचावर पंकजा मुडेंचे आव्हान धनंजय मुंडेंनी स्विकारले

बीड : वारकरी संप्रदायातील संत वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी लाखो भक्तांच्या उपस्थितीत गहिनीनाथ गडावर पार पडला. या सोहळ्यास जिल्ह्यात सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पंकजा यांनी दिलेल्या आव्हान धनंजय यांनी स्विकारले.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जयदत्त क्षीरसागर, राम शिंदे आणि आपण या जिल्ह्याच्या विकासासाठी बराच निधी दिल्याचा दावा यावेळी पंकजा मुंडे यांनी केला. आमच्या हातात जे होतं ते आम्ही केलं. आता पुढची पाच वर्षे विकास करण्यासाठी नव्या हातांमध्ये सत्ता आली आहे. ते जिल्ह्याला विकासाची कमी भासू देणार नाहीत, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत अपेक्षा व्यक्त केल्यानंतर येणाऱ्या 4 वर्षात जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्याचं आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख देण्याचं आव्हान आपण स्वीकारल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. या गहिनीनाथ गडाची, या मतदारसंघाची आणि बीड दिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आपण सर्वांच्या साक्षीनं आपल्या खांद्यावर घेत असल्याचं घोषणाच धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.

COMMENTS